पिके सडली, फळबागांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:32+5:302021-09-09T04:40:32+5:30

गेवराई : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दहाही मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी ...

Crops rotted, orchards damaged | पिके सडली, फळबागांची हानी

पिके सडली, फळबागांची हानी

Next

गेवराई : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दहाही मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात शेतकऱ्यांचे मूग, सोयाबीन, कापूस, बाजरी पावसाने सडून गेली. मोसंबी, डाळिंब, पपईच्या फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. जवळपास ९९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

...

पेरणीलायक क्षेत्र (हेक्टरमध्ये) - १ लाख ३८ हजार

पेरणी झालेले-१ लाख ८ हजार

फळबागा-१९००

नुकसानग्रस्त पिके-९९ हजार हेक्टर.

...

गेवराई, जातेगांव, मादळमोही, पाचेगाव, धोंडराई, रेवकी, तलवाडा, चकलांबा, उमापूर, गढी या दहाही मंडळात या महिन्यात १६८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र या आठ दिवसात हा टप्पा ओलांडून सरासरीपेक्षा २८० मि.मी. पाऊस झाला आहे.

....

आम्ही यावर्षी आमच्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन, मुगाची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असल्याचे राजपिपंरी येथील शेतकरी देवीदास भोसले यांनी सांगितले.

.....

गेवराई तालुक्यात गेल्या आठ दिवसांच्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे नुकसान मोठे असल्याचे येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.

080921\sakharam shinde_img-20210831-wa0091_14.jpg~080921\sakharam shinde_img-20210905-wa0038_14.jpg

Web Title: Crops rotted, orchards damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.