रेणा नदीला आलेल्या पूरामुळे पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:52+5:302021-09-02T05:11:52+5:30

रात्री मुसळधार पाऊस अंबाजोगाई : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसाने लघुसिंचन, साठवण व पाझर तलाव ओसंडून ...

Crops in water due to floods in Rena river | रेणा नदीला आलेल्या पूरामुळे पिके पाण्यात

रेणा नदीला आलेल्या पूरामुळे पिके पाण्यात

googlenewsNext

रात्री मुसळधार पाऊस

अंबाजोगाई : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसाने लघुसिंचन, साठवण व पाझर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे पिकात पाणी शिरून नुकसान झाले आहे.

तालुक्यात मागील आठवड्यातील दोन दिवस सोडले तर इतर चार दिवस संततधार पाऊस होता. सोमवारी रात्री या पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस थांबून, थांबून पडत होता. सोमवारी रात्रभर व मंगळवारी पहाटे झालेल्या या पावसाची १०५ मिलीमीटर नोंद झाली. या पावसाने जोगाईवाडी पाझर तलाव व मुरंबी लघुसिंचन प्रकल्प तुडुंब भरले. मागील आठवडाभराच्या पावसाने तालुक्यातील भावठाणा, चनई, निळकंठेश्वर हे साठवण तलाव तर डिघोळअंबा, घाटनांदूर, गोसाई कानडी हे पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले. काळवटी साठवण तलाव तर जुलै महिन्यापासूनच भरून वाहत आहे.

रेणा नदीला पूर, पिकात पाणी

रात्रीच्या पावसाने तालुक्यातील रेणा नदीला पुन्हा एकदा पूर आला. जोगाईवाडी तलाव ओसंडून वाहू लागल्याने वाघाळा व गित्ता रस्त्यावरील पुलावर पाणी आले, त्यामुळे काही वेळ हे रस्ते बंद होते. काही ठिकाणी हे पाणी सोयाबीनच्या पिकात शिरले, या पिकात पाणी साठल्याने रानावनात पाणीच पाणी असे चित्र होते. या पाण्याने पिकांचेही नुकसान होणार आहे.

310821\img-20210831-wa0113.jpg

पिकात पाणी

Web Title: Crops in water due to floods in Rena river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.