वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:21 AM2021-02-22T04:21:38+5:302021-02-22T04:21:38+5:30

महाशिवरात्र जवळ आल्यामुळे मंदिर पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेट लावणे सुरू केले आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ एक ज्योतिर्लिंग ...

Crowd of devotees for Vaidyanatha's darshan | वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next

महाशिवरात्र जवळ आल्यामुळे मंदिर पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेट लावणे सुरू केले आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ एक ज्योतिर्लिंग असल्याने येथील प्रभू वैद्यनाथच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्याने भाविकांची संख्या वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २०२० मध्ये ८ महिने बंद राहिले. मार्चपासून बंद राहिलेले मंदिर नोव्हेंबरमध्ये दिवाळीपासून उघडले आहे. नोव्हेंबरपासून भाविकांच्या चेहऱ्यास मास्क व हातावर सॅनिटायझर बंधनकारक करूनच मंदिरात भाविकाना प्रवेश दिला जात आहे. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील साहित्याची दुकाने व हॉटेल पुन्हा गजबजली आहेत. परळी रेल्वे स्थानकातून नांदेड - बेंगळुरू, बंगळुरू - नांदेड, काकिनाडा - शिर्डी, शिर्डी - काकीनाडा, नांदेड - पनवेल, पनवेल - नांदेड, औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रेल्वे रुळावरून सुरळीत धावत आहेत.

Web Title: Crowd of devotees for Vaidyanatha's darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.