गर्दी जमविली; वधूपित्यासह २०० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:58 PM2020-03-19T23:58:53+5:302020-03-20T00:00:00+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील विघ्नवाडी येथे वधूपित्यासह २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर कासार : जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील विघ्नवाडी येथे वधूपित्यासह २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू चांगदेव कनुजे यांच्या मुलीचे लग्न होते. ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी सुरेश खाडे, मनोज बरुरे, जमादार अशोक शेळके, पोना मारुती केदार लग्नस्थळी पोहचले. तेव्हा वधुवरासह वºहाडी पळून गेले. याप्रकरणी विष्णू कनुजे व अन्य २०० जणांविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जमादार अशोक शेळके करीत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा सपोनि सुरेश खाडे यांनी दिला.
आष्टीतही गुन्हे दाखल
आष्टी तालुक्यातील शेरी येथे लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालय खुले ठेवले म्हणून अंबिका लॉन्सचे मालक सुनील बाबूराव सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच बबन दिवटे आणि अजिनाथ कोठूळे (रा. केरुळ, ता. आष्टी) यांनी त्यांच्या घरासमोर मुलामुलीच्या लग्नानिमित्त मंडप उभा करुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकांची गर्दी जमा केली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणा-यांवर कारवाई करण्यात येत असून, जनतेने गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.