लसीकरण केंद्रावर महिलांसह पुरुषांची तोंबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:16+5:302021-07-17T04:26:16+5:30

गेवराई : शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी ...

Crowds of men with women at the vaccination center | लसीकरण केंद्रावर महिलांसह पुरुषांची तोंबा गर्दी

लसीकरण केंद्रावर महिलांसह पुरुषांची तोंबा गर्दी

googlenewsNext

गेवराई : शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी नागरिक, महिलांनी लसीकरणासाठी सकाळपासून तोबा गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्स नव्हता व अनेकांच्या तोंडाला मास्कदेखील नव्हते. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसत होत.

राज्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथे जागा अपुरी पडत असल्याने हे लसीकरण केंद्र नगर परिषद कार्यालयात सुरू करण्यात आले. तेथेही लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत राहिली तसेच वारंवार गोंधळ टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात लस सुरू करण्यात आली होती. मात्र गर्दी वाढतच असल्याने हे लसीकरण केंद्र जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सुरू करण्यात आले. येथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शुक्रवार सकाळी लसींचे डोस प्राप्त झाले. लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक, महिलांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. अनेकांच्या तोंडाला मास्कदेखील नव्हते त्यामुळे कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र दिसत होते. या गर्दीकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनाला निमंत्रण नका, नियमांचे पालन करा

कन्या प्रशालेत लसीकरण केंद्र सुरू असून संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी लस घेण्यासाठी तोंडाला मास्क लावून यावे. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. गर्दी न करता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लस घ्यावी असे आवाहन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी केले.

160721\sakharam shinde_img-20210716-wa0013_14.jpg~160721\sakharam shinde_img-20210716-wa0012_14.jpg

Web Title: Crowds of men with women at the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.