केजमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:48+5:302021-05-12T04:34:48+5:30
: लॉकडाऊन खरेदी करण्यासाठी काही तासांसाठी शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी सामाजिक अंतराच्या नियमाला हरताळ फासत बाजारपेठेत मोठी गर्दी केली ...
: लॉकडाऊन खरेदी करण्यासाठी काही तासांसाठी शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी सामाजिक अंतराच्या नियमाला हरताळ फासत बाजारपेठेत मोठी गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले. ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी मंगळवार व बुधवारी लॉकडाऊन काही तासांसाठी शिथिल करण्यात आला आहे. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी किराणासह काही व्यवसायांना सवलत जाहीर केली होती. मंगळवारी सकाळी सात ते अकरा यावेळेत लॉकडाऊन शिथिल होताच नागरिकांनी केज शहरातील बाजारपेठेत सर्व नियम बाजूला ठेवत साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याने बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र, कोरोना संसर्गाचा धोकाही वाढला होता. मंगळवार पेठ, कानडी रोड, मेन रोडवरील सर्व दुकानांतून नागरिक खरेदी करत असल्याचे चित्र दिसून आले. ईदनिमित्त नवीन कपड्यांची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील काही नागरिक लहान मुलांना घेऊन केजमध्ये आले होते. मात्र, कपड्यांची दुकाने बंद असल्याने त्यांना सणासाठी खरेदी करता आली नाही.
===Photopath===
110521\deepak naikwade_img-20210511-wa0020_14.jpg