गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:34 AM2018-11-18T00:34:51+5:302018-11-18T00:35:22+5:30

माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

Crush sugarcane sugarcane by cutting sugarcane | गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

googlenewsNext
ठळक मुद्देमागील हंगामातील थकबाकी अदा करा : शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.
माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर इंडस्ट्रीज आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांकडून २६५ जातीचा ऊस नेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. मात्र त्यावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. २६५ जातीचा ८ लाख टन ऊस सध्या उभा आहे. २६५ जातीचा ऊस नेण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. गाळपासाठी कारखाने गेटकेन ऊस आणत आहेत. परिणामी कार्यक्षेत्रातील २६५ जातीचा ऊस वेळेत गाळपासाठी गेला नाही तर वाळण्याची शक्यता आहे. गेटकेन ऊस बंद करुन तिन्ही कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी प्रशासनाने सूचना करावी अशी मागणी थावरे यांनी केली आहे.
२६५ जातीचा ऊस गाळपास न्यावा, शेतकºयांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील परभणी चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
२६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ
२६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा म्हणून शेतकºयांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार करुन औरंगाबाद येथे साखर सहसंचालकांना घेराव घातला होता.
त्यानंतर तिन्ही कारखान्यांनी हा ऊस नेण्याबाबत पत्र दिले होते. मात्र आता कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत.
मागील वर्षी गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकºयांचे माजलगाव कारखान्याकडे प्रती टन ८००, छत्रपती कारखान्याकडे ७०० रुपये तसेच जयमहेशकडे ४५० रुपयेप्रमाणे उसाचे बील थकलेले आहे.
प्रशासनाने सूचना केल्यानंतरही कारखान्यांनी कार्यवाही केली नसल्याचे थावरे म्हणाले. किमान दुष्काळाचे भान राखत कारखान्यांनी या रकमेचे वाटप करुन पालनकर्ते असल्याचे दाखवून द्यावे असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न घेण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली; हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. शेतातील उसाचे आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला.

Web Title: Crush sugarcane sugarcane by cutting sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.