जिजाऊंचा आदर्श घेऊन संस्कारमूल्ये रुजवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:27 AM2021-01-15T04:27:50+5:302021-01-15T04:27:50+5:30
माजलगाव : जिजाऊंनी संकटकाळात धैर्याने शिवाजी महाराजांवर संस्कारमूल्ये रुजवून युगप्रवर्तक निर्माण केला. जिजाऊंचा आदर्श महिलांनी घ्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार ...
माजलगाव : जिजाऊंनी संकटकाळात धैर्याने शिवाजी महाराजांवर संस्कारमूल्ये रुजवून युगप्रवर्तक निर्माण केला. जिजाऊंचा आदर्श महिलांनी घ्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालय राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी झाली. अध्यक्षस्थानी भानुदासराव डक होते, तर सत्यप्रकाश रुद्रवार, बाळासाहेब शिंदे, जकी बाबा, मराठी विभागप्रमुख डॉ. एम. ए. कव्हळे, उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवन शिंदे, कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. एन. प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मीना डक यांनी जिजाऊ वंदना गाऊन केली. डॉ. अर्चना कचरे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली शहाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. व्ही. आर. पुरी यांनी आभार मानले. राष्ट्रीय जिजाऊ सावित्री वारसदार पुरस्कार मिळाल्याबद्दल आरुणा स्वामी यांचा तहसीलदारांनी सत्कार केला. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.