भर पावसात सीताफळ बियांची रुजवण मोहीम - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:50+5:302021-07-16T04:23:50+5:30

धारूर : तालुक्यातील सोनीमोहा येथे श्री जगदंबा देवीच्या मंदिराजवळ वनविभागाच्या उजाड डोंगरावर सीताफळाच्या बिया रुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ...

Cultivation of Custard Seed in Heavy Rain Campaign - A | भर पावसात सीताफळ बियांची रुजवण मोहीम - A

भर पावसात सीताफळ बियांची रुजवण मोहीम - A

Next

धारूर : तालुक्यातील सोनीमोहा येथे श्री जगदंबा देवीच्या मंदिराजवळ वनविभागाच्या उजाड डोंगरावर सीताफळाच्या बिया रुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. भर पावसात महिलांसह निसर्गप्रेमींनी उत्साहात सहभाग नोंदविला. धारूर शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बी. के. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून धारुर येथील डोंगर दऱ्यात, शेतात बांधावर व मोकळ्या जागेत सीताफळ बिया टाकून सीताफळांच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढविण्याचे नियोजन करण्यात आले. ठोंबरे यांच्या आवाहनाला तालुक्यातील सोनीमोहा येथील ग्रामस्थ, तसेच वनविभागाने या प्रतिसाद दिला. सोनीमोहा गावात जगदंबा देवी मंदिराजवळ वन विभागाच्या डोंगर परिसरात सीताफळ बियांचे रोपण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार बुधवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. बी. के. ठोंबरे, वनअधिकारी शंकर वरवडे, यूथ क्लबचे माजी अध्यक्ष सुरेश शिनगारे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सरपंच गोविंद तोंडे, संदीपान तोंडे, जलदूत विजय शिनगारे, ज्ञानेश्वर शिंदे अशोक लोकरे, अविनाश चिद्रवार, आदर्श शिक्षक श्रीराम सिकची, मोहित तोंडे, सुनील तोंडे, समीर शेख, हर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, वन कर्मचारी गौतम सुरवसे, राजेंद्र तोंडे, श्रीराम तोंडे, शेख अब्बास व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, गावातील नागरिक, युवक व महिलांदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रारंभी पाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभागी होऊन गाव पाणीदार करणारे सरपंच विष्णू अडागळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

140721\2053img-20210714-wa0137.jpg~140721\2059img-20210714-wa0103.jpg

सोनीमोहा येथे वनविभागाचे ओसाड डोंगराळ सिताफळाचे बियाचे रोपन करताना~सोनीमोहा येथे जगदंबा देवी मंदीरा माघील डोंगरावर सिताफळ बियाचे रोपन

Web Title: Cultivation of Custard Seed in Heavy Rain Campaign - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.