सांस्कृतिक उपक्रमातूनच बालमनावर संस्कार होतात - अक्षय मुंदडा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:21 AM2021-02-22T04:21:29+5:302021-02-22T04:21:29+5:30

येथील दुर्गप्रेमी मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाले. ...

Cultural activities inculcate rites in the child's mind - Akshay Mundada - A | सांस्कृतिक उपक्रमातूनच बालमनावर संस्कार होतात - अक्षय मुंदडा - A

सांस्कृतिक उपक्रमातूनच बालमनावर संस्कार होतात - अक्षय मुंदडा - A

Next

येथील दुर्गप्रेमी मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड. कल्याणी विर्धे, प्रा. मुकुंद देवर्षी, भीमसेन लोमटे, धीरज लोमटे, गोविंद शिंपले, संयोजक किरण भालेकर, मिलिंद कुलकर्णी, मुन्ना होळकर, योगेश कडबाने, गोविंद कांबळे, दीपक कुलकर्णी, महादेव माने, आरती सोनेसांगवीकर यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक सृष्टी सूर्यकांत देशपांडे, द्वितीय श्रावणी रमेश भालेकर, तृतीय संस्कृती संतोष घाडगे, उत्तेजनार्थ समीक्षा राजेभाऊ आवाड या विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कल्याणी पत्की, मिलिंद कुलकर्णी, भीमसेन लोमटे, अ‍ॅड. मकरंद पत्की यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन आरती सोनेसांगवीकर यांनी केले तर आभार दीपक कुलकर्णी यांनी मानले.

Web Title: Cultural activities inculcate rites in the child's mind - Akshay Mundada - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.