सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांचा ‘संस्कृती’तर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:45+5:302021-02-09T04:36:45+5:30
गेवराई येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने १४ वर्षांपासून शहरातील गजानन नगर येथे संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतीथीनिमित्ताने ...
गेवराई येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने १४ वर्षांपासून शहरातील गजानन नगर येथे संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतीथीनिमित्ताने कीर्तन, भजनासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दरम्यान, यावेळी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कोरोना योदध्यांच्या सन्मानार्थ ‘माणसातला देव तुम्ही’ ही संगीत मैफल रंगली यामध्ये गायिका संगीता (भावसार) जोशी, मुनावर अली, शैलेंद्र निसर्गंध, नरेंद्र राठोड यांचा सहभाग होता. यावेळी गेवराई शहरासह तालुक्यातील भूमिपुत्र गायकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. सुनील मुंडे, संगीता भावसार, शैलेंद्र निसर्गंध, अनुराधा गवते, राजीव काळे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सर्व डॉक्टर, पोलीस, शिक्षक, सफाई कामगार यांनी विशेष उपस्थित दर्शविली. यानंतर रात्री ८ वा. विनोदाचार्य हभप प्रकाश म. साठे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माधव चाटे, राजेंद्र भंडारी, उत्तम नाना मोटे, डॉ. भगवान जाधव, भजनसम्राट तुळशीराम आतकरे, ॲड. प्रताप खेडकरसह आदी उपस्थित होते.