दहावी परीक्षेबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:33 AM2021-05-26T04:33:52+5:302021-05-26T04:33:52+5:30
.... ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला कडा : परिसरात गेल्या चार, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. ...
....
ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला
कडा : परिसरात गेल्या चार, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतीच्या मशागती पूर्ण झाल्या आहेत. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
....
धानोरा येथील पुलाची उंची वाढवा
धानोरा : नगर-जामखेड रस्त्यावरील धानोरा येथे कांबळी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. हा पूल आता जुनाट झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहेत. तरी या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
कढाणी प्रकल्पाचा दरवाजा खुला करा
धानोरा : आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे कढाणी प्रकल्पाचा नदीत पाणी सोडण्याचा दरवाजा उंदरखेल ग्रामस्थांनी बुजविला आहे. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा दरवाजा खुला होता. त्यामुळे उन्हाळ्यात कांबळी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. परंतु, हा दरवाजा ग्रामस्थांनी सिमेंट टाकून बुजविला आहे. यामुळे तलावाखालील सुलेमान देवळा, हिवरा, पिंपरखेड या गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी या तलावाचा दरवाजा पाटबंधारे खात्याने खुला करावा, अशी मागणी तीन गावांतील ग्रामस्थांकडून होत आहे.
.....
भोजेवाडी-दादेगाव रस्त्याचे डांबरीकरण उखडले
धानोरा : दादेगाव-भोजेवाडी रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली होती. आता या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
.....
वाळू उपसा थांबवा
आष्टी : तालुक्यातील सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. सीना नदी नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील महसूल यंत्रणेचे वाळू उपशाकडे दुर्लक्ष होते. यामुळे वर्षभर सीना नदीतून वाळू उपसा सुरू असतो. त्यामुळे वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे.
....
रस्ता रुंदीकरणाची मागणी
बीड : नगर-बीड जामखेड मार्गे रस्ता रुंदीकरणाच्या अनेक वेळा घोषणा झाल्या. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले नाही. इतर अनेक रस्ते चकचकीत झाले. या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असूनही त्याचे रुंदीकरण झाले नाही. तरी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात कडा, धानोरा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. शेतकऱ्यांनी फळबागा उभ्या केल्या आहेत. या बागांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. यंदा पाणी असूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.