सदोष वजनकाट्यांमुळे ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:00+5:302021-09-06T04:38:00+5:30
--------------------------------- खड्डयांतील पाण्यामुळे अपघाताची शक्यता अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी ...
---------------------------------
खड्डयांतील पाण्यामुळे अपघाताची शक्यता
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. यातच हाडांचे व पाठदुखीचे आजार वाढले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्डयांत पाणी साचून राहात असल्यामुळे त्या खड्डयांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------
हॉटेलसह बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
अंबाजोगाई : गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र, बारमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
---------------------------------
मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे
अंबाजोगाई : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र, आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणकचालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनाने मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडगावकर यांनी केली आहे.
-----------------------------------
युवकांना राजकीय धडे देण्याची गरज
अंबाजोगाई : सर्वच क्षेत्रांत युवक जात असले तरी राजकारणात युवकांचा शिरकाव कमी दिसून येत आहे. अनेकांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी युवकांना राजकीय विश्लेषकांद्वारे मार्गदर्शन देण्यात यावे, असे सामाजिक कार्यकर्ते सतीश दहातोंडे यांनी सांगितले.