सोयाबीनवर आता चक्री भुंग्याचे संकट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:28+5:302021-07-15T04:23:28+5:30

लोकमत न्युज नेटवर्क धारूर : गेल्या दोन दशकांपासून राज्यात सोयाबीनचे पीक नगदी पीक म्हणून मोठय़ा प्रमाणात घेतले जात आहे. ...

Cyclone beetle crisis on soybeans now - A | सोयाबीनवर आता चक्री भुंग्याचे संकट - A

सोयाबीनवर आता चक्री भुंग्याचे संकट - A

Next

लोकमत न्युज नेटवर्क

धारूर : गेल्या दोन दशकांपासून राज्यात सोयाबीनचे पीक नगदी पीक म्हणून मोठय़ा प्रमाणात घेतले जात आहे. खाद्यतेलासाठी सोयाबीनचा प्रामुख्याने वापर होत असल्याने बाजारात हमीभावापेक्षा जादा दर शेतकऱ्यांना यंदा मिळाला. गेल्या तीन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रामध्येही वाढ झाली. मात्र या पिकावर ‘चक्री भुंग्या’चे आक्रमण झाले, तर उत्पादनामध्ये ३० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते. यामुळे सोयाबीनला फुलकळी येण्याआधीच कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्यावतीने केलेल्या मार्गदर्शक सूचनांची शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे यांनी केले आहे. ‘चक्री भुंगा’ ही कीड सोयाबीन पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाच्या वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठय़ा प्रमाणात नुकसानीची शक्यता असते. प्रादुर्भाव आढळल्यास कृषी सल्ल्यानुसार उपाय करा. पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या आत पूर्ण करावी. पेरणीसाठी बियाणांचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जेथे चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट (दाणेदार) १० टक्के १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्याच्या आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा १५ दिवसांतून जर दोनदा अवलंब केल्यास होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के लिंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच ७-१० दिवसात ट्रायझोफॉस ४० ई. सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड. सी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Web Title: Cyclone beetle crisis on soybeans now - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.