कापूस, मूग, सोयाबीनचे नुकसान; पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:52+5:302021-09-03T04:34:52+5:30
अतिवृष्टीमुळे काबाडकष्ट करून जोपासलेल्या व हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने महसूल, कृषी विभागाने तत्काळ थेट बांधावर ...
अतिवृष्टीमुळे काबाडकष्ट करून जोपासलेल्या व हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने महसूल, कृषी विभागाने तत्काळ थेट बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गोविंद मस्केंसह शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्यातील जवळपास ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या झालेल्या आहेत. कवडगाव आणि वडवणी मंडळात अतिवृष्टी झाली. जोरदार पावसाने तालुक्यातील मामला, साळिंबा, पिंपरखेड, चिंचोटी, बाहेगव्हाण, तिगाव, मोरवड, पुसरा, सोन्ना, खडकी देवळा, चिखलबीड, कवडगाव, देवडी, देवगाव, खापरवाडी, चिंचाळा कुप्पा या गावातील कापूस, मूग, कांदा, सोयाबीन, बाजरी, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील बंधारे, नदी, ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरून खळखळून वाहत आहेत. मामला, चिंचोटी, साळींबा तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.