आगार व्यवस्थापकास धक्काबुक्की

By admin | Published: May 10, 2017 02:11 AM2017-05-10T02:11:04+5:302017-05-10T02:11:04+5:30

येथील बसस्थानकातील आगार व्यवस्थापक मावेर पन्नालाल लोढा यांना ओव्हरटाइम ड्युटी का देत नाही म्हणून दोन बसचालकांनी धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

Damage to the deposit manager | आगार व्यवस्थापकास धक्काबुक्की

आगार व्यवस्थापकास धक्काबुक्की

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील बसस्थानकातील आगार व्यवस्थापक मावेर पन्नालाल लोढा यांना ओव्हरटाइम ड्युटी का देत नाही म्हणून दोन बसचालकांनी धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
आगार व्यवस्थापक लोढा हे नित्याप्रमाणे आपल्या दालनात कार्यमग्न होते. बीड बस आगारातील चालक रामेश्वर खाडे व बप्पासाहेब गायके हे मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या दालनात घुसले. त्यांनी आम्हाला ओव्हरटाइम ड्युटी का देत नाहीत, या कारणावरून लोढांशी हुज्जत घातली. तसेच त्यांनी लोढांना धक्काबुक्की केली. इतर कर्मचारी तेथे आले. त्यांनी खाडे, गायके यांना रोखले. दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Damage to the deposit manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.