वादळाने फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:18+5:302021-05-11T04:35:18+5:30

... तलावानजीक पुलाची दुरुस्ती करा वडवणी : वडवणीहून कवडगावकडे जाण्यासाठी एकमेव मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मामला तलावानजीक ...

Damage to orchards by storms | वादळाने फळबागांचे नुकसान

वादळाने फळबागांचे नुकसान

Next

...

तलावानजीक पुलाची दुरुस्ती करा

वडवणी : वडवणीहून कवडगावकडे जाण्यासाठी एकमेव मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मामला तलावानजीक जुना पूल धोकादायक बनला आहे. पुलाचे कठाडे तुटले आहेत. पुलावर खड्डे पडले असल्याने किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

...

ऑनलाइन नोंदणीची अट शिथिल करा

वडवणी : शासनाने ‘१८ ते ४४ वयोगटांतील प्रत्येकाना कोविड लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ऑनलाइन नोंदणी करताना ग्रामीण भागात अनेकांना अडचणी येत आहेत. अनेक जणांकडे साधे मोबाइल असल्याने ऑनलाइन करणे अवघड बनले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व शहरातील अनेक जण लसीकरणासाठी ऑनलाइन प्रक्रियासाठी ये-जा करतात. त्यामुळे शासनाने लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची अट शिथिल करण्याची मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग मस्के यांनी केली आहे.

...

गाव तिथे लसीकरण द्या

वडवणी : सध्या कोविडमुळे लाॅकडाऊनला प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, लसीकरणासाठी वडवणी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जावे लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची परवड थांबवावी. ग्रामीण भागात गाव तिथे लसीकरण करावे, अशी मागणी वयोवृद्ध नागरिकांची होत आहे. .

..

लसीकरण केंद्रातून संसर्गाचा धोका

वडवणी : लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. दिलेल्या सूचनेनुसार वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र, लसीकरणासाठी नागरिक कुठल्याही प्रकारे खबरदारी न घेता, गर्दी करीत असल्याने लसीकरण केंद्रातून संसर्गाचा धोका वाढला जात आहे. ५० वयोगटापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

...

उन्हाळी मशागतीला वेग

वडवणी : शेतक-यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने उन्हाळी नांगरट, मोगडा व पाळी कामे सुरु झाले आहेत. खरिपाची पेरणी सुरू करायची असल्याने, शेतकऱ्यांनी शेतातील दुसरी पाळी सुरू केली आहे. शेतातील काड्या, कुड्या वेचून रान निर्मळ केले जात आहे.

....

वडवणी बाजारात गर्दी वाढली

वडवणी : पाच दिवसांचा लाॅकडाऊन वाढवला असतानाही शहरात सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून भाजीपाला व फळ विक्रेते यांनी बाजारात गर्दी केली. कोरोना लाॅकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Damage to orchards by storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.