वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:08+5:302021-03-04T05:02:08+5:30

वाहनांचे नुकसान अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ...

Damage to vehicles | वाहनांचे नुकसान

वाहनांचे नुकसान

googlenewsNext

वाहनांचे नुकसान

अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच लहान मोठे मातीचे ढीग यामुळे एसटी बस व खासगी वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अंबाजोगाई आगाराच्या बस आदळून खिळखिळ्या झाल्या आहेत. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. यासाठी या रस्त्याची दुरूस्ती लवकर करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

काटेरी झुडपे वाढली

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता वाढलेली ही झुडपे रस्त्यावर आल्याने दुचाकी व चार चाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपामुळे इजाही झालेली आहे.

विद्यार्थ्यांचे गणवेश वाटप रखडले

अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील प्राथमिक शाळा बंद राहिल्या. परिणामी विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचा कार्यक्रमही रखडला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश केव्हा मिळणार किंवा या वर्षीचे गणवेश पुढील शैक्षणिक वर्षात मिळणार, याची चर्चा पालकांमध्ये सुरू आहे.

आठ तास वीज पुरवठ्याची प्रतीक्षा

अंबाजोगाई : नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली. परंतु अद्याप शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे. शेतकऱ्यांना रात्री जागून रब्बी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

दंड होत नसल्याने बेफिकिरी वाढली

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन तालुक्यात होत नाही. प्रशासनही याबाबत उदासीन आहे. अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने एक दिवस मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कारवाईचे सत्र एक दिवसातच संपले. नागरिकांनाही दंड होत नसल्याने त्यांच्यात बेफिकिरी वाढली आहे.

Web Title: Damage to vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.