रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:26+5:302021-04-20T04:35:26+5:30

अंबेजोगाई : शहर व परिसरात, तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, तसेच लहान-मोठे मातीचे ...

Damage to vehicles due to digging of roads | रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांचे नुकसान

रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांचे नुकसान

Next

अंबेजोगाई : शहर व परिसरात, तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, तसेच लहान-मोठे मातीचे ढीग यामुळे एसटी बस व खासगी वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अंबेजोगाई आगाराच्या बस आदळून खिळखिळ्या झाल्या आहेत. यासाठी या रस्त्याची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाहन चालकांना झुडपांचा त्रास

बीड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या वर्षी मोठ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडपांची मोठी वाढ झाली. आता ही झुडपे रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपामुळे इजाही झालेली आहे.

मास्कची चढ्या भावाने विक्री

अंबेजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो, अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात, तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहक कमी दरातील साध्या मास्कची खरेदी करताना दिसतात.

कोरोना नियमांची होतेय पायमल्ली

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तरीही नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, मास्क लावून गरज असेल तरच फिरावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

Web Title: Damage to vehicles due to digging of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.