बीड जिल्ह्यात २४०४ रोमिओंना दामिनीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:48 AM2018-11-24T00:48:45+5:302018-11-24T00:50:09+5:30

छेडछाडीला आळा बसावा यासाठी दामिनी पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी महिला व मुलींची छेड काढणाऱ्या तब्बल २४०४ रोमिओंना धडा शिकवला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. ही आकडेवारी जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यानची आहे. कारवायांबरोबरच शाळा, महाविद्यालये, बचतगटांना भेटी देऊन सुरक्षिततेबद्दल विश्वासही दिला आहे.

Damini of 2404 Romanos in Beed district | बीड जिल्ह्यात २४०४ रोमिओंना दामिनीचा दणका

बीड जिल्ह्यात २४०४ रोमिओंना दामिनीचा दणका

googlenewsNext
ठळक मुद्दे१० महिन्यातील कारवाया : शाळा, महाविद्यालये, बचतगटांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : छेडछाडीला आळा बसावा यासाठी दामिनी पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी महिला व मुलींची छेड काढणाऱ्या तब्बल २४०४ रोमिओंना धडा शिकवला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. ही आकडेवारी जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यानची आहे. कारवायांबरोबरच शाळा, महाविद्यालये, बचतगटांना भेटी देऊन सुरक्षिततेबद्दल विश्वासही दिला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात छेडछाडीचे प्रकार वाढले होते. शाळा, महाविद्यालयात जाणाºया मुलींना रस्त्यावर उभा राहून मुले छेडत होते. तसेच महिलांबाबत छेडछाडीच्या घटना घडलेल्या आहेत. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एका जिल्हा पथकासह ११ तालुक्यांमध्ये एक दामिनी पथक स्थापन केले. दुय्यम अधिकाºयांसह तीन कर्मचारी पथकात नियुक्त केले. पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर सर्वच पथके जोमाने कामाला लागली.
सर्व कारवाया पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.
अशा केल्या कारवाया
दहा महिन्यात तब्बल २४०४ रोडरोमिओंना पकडून चोप दिला आहे. तसेच १३९ जणांना न्यायालयात पाठविले आहे.
ठाणे प्रभारींनी २२६५ रोमिओंना ताकीद दिली. त्यांच्याकडून ६५ हजार १६० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
कारवायांबरोबरच २३०३ शाळा, महाविद्यालये, ४३४ महिला बचतगटांना भेटी देऊन सुरक्षिततेबद्दल जाणीव करुन देण्यात आली आहे.
यासोबतच मोबाईलवर प्राप्त झालेल्या १९८ पैकी १८९ तक्रारी निकाली काढल्या आहेत.
दामिनी पथकाच्या कारवायांमुळे महिला-मुलींमध्ये समाधान आहे.
\\\\
छेडछाडीला आळा बसावा म्हणून जिल्ह्यात १२ दामिनी पथके नियुक्त केलेली आहेत. प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जातो. महिला व मुलींमध्ये सुरक्षितता निर्माण झाली आहे. यापुढेही कारवाया सुरुच राहतील. न घाबरता तक्रारी कराव्यात. बीड पोलीस सोबत आहेत.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक

Web Title: Damini of 2404 Romanos in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.