प्रपोज करणा-यांवर बीडमध्ये ‘दामिनी’ पथकाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:13 AM2018-02-08T00:13:43+5:302018-02-08T00:13:54+5:30
‘व्हॅलेंटाईन वीक’ला बुधवारी ‘रोझ डे’ने सुरूवात झाली. पहिला दिवस तरूणाईने मोठ्या उत्साहात साजरा केला. आता गुरूवारी ‘प्रपोज डे’ आहे. या दिवशी एकतर्फी प्रेम करणाºयांकडून छेडछाडीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दामिनी पथक ‘अॅक्टीव्ह’ झाले आहे. अशा रोमिओंवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘व्हॅलेंटाईन वीक’ला बुधवारी ‘रोझ डे’ने सुरूवात झाली. पहिला दिवस तरूणाईने मोठ्या उत्साहात साजरा केला. आता गुरूवारी ‘प्रपोज डे’ आहे. या दिवशी एकतर्फी प्रेम करणाºयांकडून छेडछाडीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दामिनी पथक ‘अॅक्टीव्ह’ झाले आहे. अशा रोमिओंवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे.
या पथकाची नजर चुकवून आवडत्या व्यक्तीला प्रेमाचा ‘इजहार’ करण्यासाठी तरूणाईने नियोजन केल्याचे दिसून येत आहे. ‘प्रेम’ असा शब्द कानी पडला की आपल्या डोळ्यासमोर फक्त युगूल दिसतात. याच्या पलिकडेही प्रेम आहे, याची जाणीव अनेकांना नसते. आई-वडिलांवर, मुले आई-वडिलांवर, मित्र मैत्रिणींवर, मैत्रिण मित्रावर, मित्र मित्रांवर, पती पत्नीवर, पत्नी पतीवर हे सद्धा एकमेकांवर प्रेम करू शकतात. परंतु तरूणाच्या मनात काही ‘औरच’ असते. फेब्रुवारी महिना आला की त्यांना वेध लागते ते व्हॅलेंटाईनचे.
या सप्ताहातील प्रत्येक दिवस ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. यामध्ये त्यांचा निस्वार्थपणाही तेवढाच जाणवतो. जो कोणी आपल्या मैत्रितील निस्वार्थ ‘प्रेम’ टिकवून ठेवतो, त्यांचे ‘प्रेम’ आयुष्यभर एकमेकांना साथ देते, अशी अनेक उदाहरणेही आहेत. त्यामुळे प्रत्येकाने निस्वार्थ प्रेम करणे गरजेचे आहे.
दरम्यान, बुधवारी ‘रोझ डे’ जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांमधील युवक, युवतींमध्ये उत्साह आधिक जाणवला. सकाळपासूनच फुल विक्रेत्यांकडे गुलाब खरेदीसाठी तरूणाईने गर्दी केल्याचे चित्र शहरात दिसून आले.
गुलाबाची आवक अन् भाव वाढले
रोझ डे च्या निमित्ताने फुल विके्रत्यांनी गुलाबाची आवक वाढविली होती. यामध्ये लाल गुलाबाला जास्त मागणी दिसून आली. एरव्ही लाल गुलाब दहा रूपयांना मिळत असते. परंतु बुधवारी याची किंमत पाच ते दहा रूपयांनी वाढल्याचे दिसून आले. पांढरा, गुलाब व पिवळ्या गुलाबालाही बºयापैकी मागणी होती, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
आम्ही सोबत आहोत - गित्ते, माने
छेडछाडीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकांची नियूक्ती केली आहे. व्हॅलेंटाईनच्या दरम्यान छेडछाड होण्याचे प्रकार घडू शकतात. सर्व पथक प्रमुखांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. छेडछाड होत असेल तर तात्काळ दामिनी पथकाशी संपर्क करावा. आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत माने, दिपाली गित्ते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उद्या चॉकलेट डे
गोड धोड तोंड केले तर प्रेमात आणखीनच बहार येते. लहानपणापासूनच प्रत्येकाला चॉकलेटची आवड असते. ही आवड तरूणाईमध्ये आजही टिकून आले. त्यामुळेच व्हॅलेंटाईन वीक मध्ये एक दिवस चॉकलेटसाठी दिला आहे. शुक्रवारी चॉकलेट डे आहे. त्या पार्श्वभूमिवर ‘दिल’ आकाराच्या चॉकलेट बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. अशा आकाराच्या चॉकलेटलाच प्रत्येक वर्षी अधिक मागणी असते, असे दुकानदारांकडून सांगण्यात आले.