मुलींची तक्रार येताच दामिनी पथक पाच मिनिटात पोहचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:48 AM2018-10-27T00:48:21+5:302018-10-27T00:48:56+5:30
छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला.
महिला, मुलींची सुरक्षितता रहावी, त्यांना रोमिओंकडून त्रास होऊ नये, छेडछाडीला आळा बसावा, या हेतूने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली. पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांच्यावर या सर्व पथकांची जबाबदारी दिलेली आहे. सध्या या पथकाचे काम समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, शुक्रवारी रात्री सात वाजता सुनिता (नाव बदललेले) या मुलीने माने यांच्याकडे तक्रार केली. मागील पाच दिवसांपासून हा मुलगा आपला पाठलाग करण्याबरोरच टाँट मारत असल्याचे सांगितले. माने यांनी तात्काळ दाखल होत सदरील मुलाला ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेत यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर त्याने आपली चुक मान्य करीत माफी मागितल्याचे समजते. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही येथील अधिकाºयांनी सांगितले. माने यांच्यासोबतच बीडच्या पथक प्रमुख रंजना सांगळे या सुद्धा होत्या.
दामिनी पथकाने तत्परता दाखवित केलेल्या कारवाईमुळे महिला व मुलींना आधार मिळाला आहे. या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.