डान्स टीचरला ऑनलाईन गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:28+5:302021-01-16T04:37:28+5:30
बीड : मुलाच्या वाढदिवशी नृत्य कार्यक्रम ठेवायचा असे सांगून त्याचे पैसे पाठविण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून तालुक्यातील ...
बीड : मुलाच्या वाढदिवशी नृत्य कार्यक्रम ठेवायचा असे सांगून त्याचे पैसे पाठविण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून तालुक्यातील नवगण राजुरी येथील डान्स टटीचरला ५८ हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार १० जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी १३ जानेवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सागर शिवाजी वैद्य हा खाजगी डान्स टीचर आहे. १० जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील पंकजकुमार पांडे नामक इसमाने दोन भ्रमणध्वनीद्वारे त्याला कॉल करून मुलाच्या वाढदिवसाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा असल्याचे सांगून बोलणी केली. क्यूआर कोड स्कॅन करण्याचे सांगून फोनपेवरून ठरल्याप्रमाणे रक्कम पाठवतो, असे भासविले. क्यूआर कोड स्कॅन करताच फोनपेमधून सागर वैद्यचे ५८ हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सागर वैद्य याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात पंकजकुमार पांडे रा. शेगाव जि. बुलढाणा याच्याविरुद्ध फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल असून तपास पोनि साबळे करीत आहेत.