वरातीत नाचताना चक्कर येऊन नवरदेवाच्या काकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:56 AM2019-01-04T00:56:37+5:302019-01-04T00:57:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : लग्नाच्या वरातीमध्ये नाचणाऱ्या ७० वर्षीय इसमाचा चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : लग्नाच्या वरातीमध्ये नाचणाऱ्या ७० वर्षीय इसमाचा चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आनंदाच्या सोहळ्यात या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला. मयत इसमाचे नाव मधुकर देविदास लिंगायत (वय ७०, रा. मालेगाव, जि. नाशिक) असून, ते नवरदेवाचे काका (मावशीचे पती) असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील वाणी मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी १२. ३० वाजता येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न होते. पैठण येथील मुलाकडचे वºहाड आले होते. परण्या निघाल्यानंतर मधुकर देवीदास लिंगायत हे गाण्याच्या तालावर डि.जे. समोर नाचत असताना अचानक चक्कर आल्याने खाली कोसळले. हे पाहून सोबत नाचणाºया पाहुणे व प्रत्यक्षदर्शी मंडळीने तात्काळ मधुकर लिंगायत यांना वाहनातून शहरातील एका खाजगी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत झाल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मधुकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
लग्न समारंभ म्हणजे वर आणि वधूकडील कुटुंबासाठी आनंदाचा प्रसंग असतो. मात्र, लग्नसोहळ्याचे भान राखत घटनेची माहिती कोणालाही न सांगता लग्न उरकले. त्यानंतर ही घटना समजल्यावर सर्व लग्न समारंभात दु:खाचा डोंगर कोसळला. अनेकांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी गेवराई ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास तपास एएसआय आईटवार करत आहेत.