राष्टवादी काँग्रेससाठी ही तर धोक्याची घंटा; क्षीरसागरांचे राजकीय भविष्य सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:09 AM2019-05-25T00:09:20+5:302019-05-25T00:09:56+5:30

पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही.

This is the danger bell for nationalist Congress; Kshirsagar's political future is made possible | राष्टवादी काँग्रेससाठी ही तर धोक्याची घंटा; क्षीरसागरांचे राजकीय भविष्य सुकर

राष्टवादी काँग्रेससाठी ही तर धोक्याची घंटा; क्षीरसागरांचे राजकीय भविष्य सुकर

Next

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही.
लोकसभा २०१९ निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, राष्टवादीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. नोंदणीकृत पक्षांचे दहा व अपक्ष २३ असे ३६ उमेदवार मैदानात होते. बीड मतदार संघात एकूण २ लाख ७ हजार ९७५ मतदान झाले. यात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना ९६ हजार ३८८ तर राष्टवादीचे बजरंग सोनवणे यांना ९० हजार ५६५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना ११ हजार ६०१ मते मिळाली.
या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न झाला. तर माजी आ. सुरेश नवले, बाबुुराव पोटभरेसह काही नेत्यांनी जाहीरपणे भाजपविरोधात रान उठविले. राष्टÑवादीच्या उमेदवारासाठी जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची फौज सज्ज ठेवत अगदी लहान गावातही बैठक व प्रचार केला. तर या निवडणुकीत राष्टÑवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, संघटनांच्या बैठक घेत त्यांनी भाजपच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या यंत्रणेचीही मदत झाली. निर्णायक भूमिकेमुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नियोजनबध्द प्रचार यंत्रणा, बूथ यंत्रणा राबविली. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली. यातच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ११ हजार मते खेचली. परंतू जनमतापुढे राष्टÑवादीला ब्रेक लागला.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्षीरसागर यांच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न झाले. जयदत्त क्षीरसागर गटाची सरशी झाली, त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसला चिंतन करावे लागणार आहे.

Web Title: This is the danger bell for nationalist Congress; Kshirsagar's political future is made possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.