बोटांच्या स्पर्शाने कोरोनाचा धोका;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:18+5:302021-05-07T04:35:18+5:30
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बँका बाहेर व एटीएममधून पैसे काढताना कुठे सोशल डिस्टन्सचे पालन होते.तर कुठे नाही. मात्र ...
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बँका बाहेर व एटीएममधून पैसे काढताना कुठे सोशल डिस्टन्सचे पालन होते.तर कुठे नाही. मात्र शहरातील एटीएम अजूनही निर्जंतुकीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे.त्यात अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.अशा स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बँकांनी ही ग्राहकांची सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. मात्र तसे दिसत नाही. कोरोना संक्रमणाच्या काळात बँकेच्या एटीएम मध्ये येणारे ग्राहक एटीएम मशीनच्या बटनांना स्पर्श करतात. प्रत्येकाने अशा पद्धतीने मशिनला स्पर्श केला तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही. अंबाजोगाई शहरात बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक,एचडी एफसी,आयसीआयसीआय, व इतर ही बॅंकांचे एटीएम शहर व परिसरात आहेत.सध्या लॉकडाऊन असल्याने बँकेच्या वेळा सकाळी १०ते १२ या मर्यादित वेळेत उघड्या ठेवण्याचे आदेश आहेत. या वेळेत बँकेतही मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी बहुतांश बँकेचे ग्राहक एटीएम सेवेलाच प्राधान्य देतात. शहरातील सर्वच एटीएम वर दिवसभर पैसे काढण्यासाठी गर्दी असते. या गर्दीत अनेकजण तिथे ठेवलेल्या सॅनिटायझर चा वापर न करताच बोटांचा स्पर्श मशिनला करतात.हा प्रकार वाढतच चालला आहे. परिणामी संसर्ग वाढीसाठी हा प्रकार धोकादायक ठरू लागला आहे.अनेक एटीएम च्या बाहेर सुरक्षा रक्षक आहेत.मात्र ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात.एखादया संक्रमित व्यक्तीने मशीन हाताळली व त्यानंतर इतरांनी तर संसर्गाचा मोठा धोका निर्माण होईल.त्यामुळे अनेक ग्राहक एटीएम कडे फिरकत ही नाहीत.या कडे बँक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.अन्यथा कोरोनाच्या संसर्गास एटीएम ही कारणीभुत ठरतील याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
===Photopath===
060521\20210505_221900_14.jpg