‘जैविक’ कचऱ्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:19+5:302021-04-16T04:34:19+5:30
बस सुरू करा अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना ...
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.
इंटरनेट सेवा विस्कळीत
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला गती मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
रस्ता दुरुस्ती करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
लघु व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.