माजलगाव धरण परिसरात अंधार, विद्युत दिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:43+5:302021-06-05T04:24:43+5:30

माजलगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माजलगावात धरणावरील भिंतीवर पथदवे व धरणाच्या गेटवरील जवळपास सर्वच विद्युतदिवे अनेक महिन्यांपासून बंद ...

Darkness in Majalgaon dam area, electric lights off | माजलगाव धरण परिसरात अंधार, विद्युत दिवे बंद

माजलगाव धरण परिसरात अंधार, विद्युत दिवे बंद

Next

माजलगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माजलगावात धरणावरील भिंतीवर पथदवे व धरणाच्या गेटवरील जवळपास सर्वच विद्युतदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत; तर काही खांब नुसते शोभेलाच रोवलेले दिसतात. त्यामुळे धरण परिसरात रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो. धरणावर संबंधित विभागाचे कर्मचारी व धरणाच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस यांना कर्तव्य बजावताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी धरण परिसरात अनेक नागरिक ये-जा करत असतात. हे ये-जा करणारे कोण व्यक्ती आहेत, याची खात्री कर्मचारी व पोलिसांना करता येत नाही. संबंधित व्यक्ती जवळ येईपर्यंत ओळखता येत नसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ होत आहे.

धरणावरील लाईट सुरू असल्यास येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जागेवर बसून धरण परिसरात सर्व ठिकाणी लक्ष देता येते. परंतु अनेक महिन्यांपासून भिंतीवरील पथदिवे व गेटवरील विद्युत दिवे बंद असल्याने येथील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धरणावरील पथदिवे तसेच गेटवरील लाईट अनेक दिवसांपासून बंद आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले असून, काही दिवसातच या ठिकाणी विद्युतदिवे बसविण्यात येतील.

- बी. आर. शेख, धरण अभियंता, माजलगाव

===Photopath===

040621\img_20190516_122733_14.jpg

Web Title: Darkness in Majalgaon dam area, electric lights off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.