आरोग्य विभागातर्फे ‘डास निमूर्लन’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:34+5:302021-09-26T04:36:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे व दलदलीचा परिणाम हा डासांना पोषक ठरत आहे. यामुळे ...

‘Das Nimurlan’ campaign by the Department of Health | आरोग्य विभागातर्फे ‘डास निमूर्लन’ मोहीम

आरोग्य विभागातर्फे ‘डास निमूर्लन’ मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे व दलदलीचा परिणाम हा डासांना पोषक ठरत आहे. यामुळे थंडी, तापासारखा आजार जोर धरत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक ‘डास निर्मूलन’ मोहीम सुरू केली आहे. डासांचा फडशा पाडण्यासाठी तालुक्यात शंभर ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र उभारले आहेत, अशी माहिती डॉ. अशोक गवळी यांनी दिली.

शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १३, तर खालापुरीअंतर्गत ८७ पैदास केंद्रे उभारली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहनदेखील केले आहे.

शिरूर, खालापुरी व रायमोह प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका या मोहिमेत सहभागी आहेत. गावा-गावात व घरोघरी फिरून पाणी साठे तपासले जात आहेत. डासांचा मागमुस दिसून आला की ते पाणी ओतून दिले जाते. नव्याने पाण्यात ॲबेटिंग करून गप्पी माशांची पिलावळ सोडली जात आहे. यामुळे डासांची पैदास थांबणार आहे. थंडी, ताप या रोगांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे. पाणी साचून राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेणे जरूरी असल्याचे सांगण्यात आले.

या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खाडे, डॉ. सुहास खाडे, डॉ. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक थिगळे, नारायण सानप, साजिद शेख, पी. के. सानप, आशासेविका या मोहिमेत काम करीत आहेत.

...

नगरपंचायती, ग्रामपंचायतींनी फवारणी करावी

नगरपंचायत व सर्व ग्रामपंचायतींना औषध व धूर फवारणीबाबत पत्र दिले होते. मात्र याकडे सर्वचजण कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्याची बाब असल्याने संबंधित नगरपंचायत, ग्रामपंचायतींनी औषध, धूर फवारणीसह तणनाशक फवारणी करावी. प्रत्येक कुटुंबाने एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.

250921\img-20210925-wa0021.jpg

शिरूर तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने डास निमूर्लन मोहीम राबविण्यात येत आहे.

Web Title: ‘Das Nimurlan’ campaign by the Department of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.