एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 12:44 PM2021-11-18T12:44:12+5:302021-11-18T12:45:16+5:30

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे दि. २९ व ३० डिसेंबर रोजी हे संमेलन होणार आहे.

Dasu Vaidya as the President of Ekta Marathi Sahitya Sanmelana | एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य

एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य

Next

शिरूर कासार (जि. बीड) : येथील एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित चौथे एकता मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गीतकार, साहित्यिक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे मराठी विभागप्रमुख प्रा. डाॅ. दासू वैद्य यांची एकमताने निवड करण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक सदस्य लखूळ मुळे, नितीन कैतके व राजेश बीडकर यांनी ही माहिती दिली.

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे दि. २९ व ३० डिसेंबर रोजी हे संमेलन होणार आहे. फाउंडेशनचे कोषाध्यक्ष योगगुरू शिवलिंग परळकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव गोकुळ पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीस संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, उपाध्यक्ष उपप्राचार्य माही शेख, सहसचिव शिवचरित्रकार कैलास तुपे, व्यंगचित्रकार दीपक महाले, इंजि. संदीप ढाकणे, कैलास खेडकर फौजी आदी सभासद उपस्थित होते.

फाउंडेशनच्या सल्लागार तथा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. भाग्यश्री ढाकणे, शि. सह.पत.च्या संचालिक रंजना फुंदे, आदर्श शिक्षिका मीरा दगडखैर आणि ब्रँड हाऊसच्या संस्थापिका रंजना डोळे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली. या संमेलनामध्ये व्यंगचित्र प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्रीचे स्टाॅलही लागणार आहेत. राज्यभरातील कवी, लेखक, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दाेन दिवसांत भरगच्च कार्यक्रम, उपक्रम

दोन दिवसीय होणाऱ्या संमेलनात पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, सन्मान भूमिपुत्रांचा, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार वितरण सोहळा, व्यंगचित्र प्रदर्शन, महाराष्ट्राची लोकधारा, लेखक आपल्या भेटीला, मी असा घडलो-आयएएस, आपीएस अधिकाऱ्यांची मुलाखत, प्रश्नमंजूषा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, समारोप आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Dasu Vaidya as the President of Ekta Marathi Sahitya Sanmelana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.