नगरपंचायतीचे दिवसा दिवे - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:05+5:302021-04-08T04:33:05+5:30
शहरातील पथदिवे दिवसादेखील चालू असल्याने अनाठायी वीज खर्ची होत असून या बाबीकडे नगरपंचायत लक्ष देत नसल्याचे दिसून येते. ...
शहरातील पथदिवे दिवसादेखील चालू असल्याने अनाठायी वीज खर्ची होत असून या बाबीकडे नगरपंचायत लक्ष देत नसल्याचे दिसून येते. दिवसा दिवे बंद करावेत, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
उष्णता वाढल्याने घामाच्या धारा
शिरूर कासार : दिवसेंदिवस उन्हाचा चढता पारा आता सहन होत नसून शेतातील कामे तर केल्याशिवाय पर्याय नाही. परिणामी घामाच्या धारा वाहत असल्याने शेतकरी हवालदिल होत असल्याचे बबन पवार, सखाराम कदम, सर्जेराव सव्वासे यांनी सांगितले.
चढत्या उष्णतेचा पशुधनावर परिणाम
शिरूर कासार : सूर्य दिवसेंदिवस अधिक तापत असल्याने उष्णतेचा पारा चढता असून त्याचा पशुधनाच्या आरोग्यावर देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन शक्यतो सावलीलाच बांधावे. त्यांना जमेल तसा हिरवा चारा द्यावा. तसेच दुपारच्या वेळेला जनावरांच्या पाठीवर माथ्यावर पाणी टाकावे किंवा ओले पोते पाठीवर टाकावे, पाणी पाजण्याची वेळ सांभाळावी, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
दुकाने बंद, मात्र रस्त्यावर वर्दळ
शिरूर कासार : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. आता तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवली गेली. मात्र, अजूनही नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असल्याचे चित्र दिसत आहे. कामाशिवाय बाहेर पडू नका, मास्क व सुरक्षित अंतर याबाबी कटाक्षाने पाळा, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.
शेतकरी नांगरट करण्यात व्यस्त
शिरूर कासार :
रबी हंगामातील पीक काढणी होऊन मोकळी झालेले शेत आता शेतकरी नांगरून घेत आहेत. नांगरलेली शेत तापली म्हणजे पुढील हंगामात त्याचा फायदा होत असल्याचे मधुकर बांदल, विनोद गाडेकर, ठकाराम कदम यांनी सांगितले.