दिवस असो वा रात्र... कोरोनाबाधितांसाठी युवकाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:55+5:302021-04-28T04:36:55+5:30
जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमी, मयत येतात. तसेच अनोळखी रुग्णही असतात. त्यांच्याकडे काेणीच लक्ष देत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना काहीच ...
जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमी, मयत येतात. तसेच अनोळखी रुग्णही असतात. त्यांच्याकडे काेणीच लक्ष देत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना काहीच माहिती नसते. त्यामुळे त्यांचे हाल होतात. हाच त्रास सहन न झाल्याने आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अजय सुरवसे या युवकाने वर्षभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात मदत केंद्र सुरु केले. सर्वत्र आपला संपर्क क्रमांक देऊन अडचणीतील लोकांना मदत करु लागला. वर्षभरात अपघातग्रस्त, अडचणीतील रुग्ण, गरीब आणि आता कोरोनाबाधित रुग्नांना मदत करण्याचे काम हा युवक करत आहे. घरी पत्नी आणि छोट्या बाळाला एकटे सोडून हा युवक सामान्य लोकांसाठी जीव धोक्यात घालून सेवा करत आहे. वर्षभरात त्याने आतापर्यंत हजारो रुग्णांना मदत आणि आधार देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच रक्तदान शिबीर, फळ वाटप आदी उपक्रमही राबवून त्याने आदर्श निर्माण केला आहे.
===Photopath===
270421\27_2_bed_16_27042021_14.jpeg
===Caption===
कोरेानाबाधित रूग्णांना मदत करणारा युवक अजय सुरवसे दिसत आहे.