दोघांचा मृत्यू; नवे १७४ रुग्ण तर ९१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:34+5:302021-07-14T04:38:34+5:30

बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १, आष्टी ७०, बीड ३१, धारूर १०, गेवराई १५, केज १२, माजलगाव १, पाटोदा २५, ...

Death of both; 174 new patients and 91 coronary free | दोघांचा मृत्यू; नवे १७४ रुग्ण तर ९१ कोरोनामुक्त

दोघांचा मृत्यू; नवे १७४ रुग्ण तर ९१ कोरोनामुक्त

Next

बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १, आष्टी ७०, बीड ३१, धारूर १०, गेवराई १५, केज १२, माजलगाव १, पाटोदा २५, शिरूर ४ व वडवणी तालुक्यातील ५ रुग्णांचा समावेश आहे. परळी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही तसेच मागील २४ तासांत दोन मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. त्यात गेवराई येथील ३६ वर्षीय महिला व धुनकवड (ता.धारूर) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकूण मृत्यूचा आकडा २ हजार ५५८ झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ९३ हजार ७६२ इतकी झाली असून यापैकी ९० हजार ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ हजार १७० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: Death of both; 174 new patients and 91 coronary free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.