दोघांचा मृत्यू ; ५१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:46+5:302021-02-27T04:45:46+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ८७२ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर, ५१ नवे रुग्ण ...

Death of both; 51 new patients | दोघांचा मृत्यू ; ५१ नवे रुग्ण

दोघांचा मृत्यू ; ५१ नवे रुग्ण

Next

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ८७२ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर, ५१ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ०९, आष्टी तालुक्यातील ५, बीड तालुक्यातील २२, गेवराईमधील १, केजमधील ४, माजलगावातील ४, परळीतील २, पाटोदा येथील १ तर, शिरुर तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील ७० वर्षीय पुरुष आणि परळीच्या हालगे गल्लीतील ७२ वर्षीय पुरुषाचा मृतांत समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ६६३ इतकी झाली आहे. पैकी १७ हजार ७७० जण कोरोनामुक्त झाले असून ५७७ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेला आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: Death of both; 51 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.