विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:32 AM2018-07-13T00:32:32+5:302018-07-13T00:33:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेतलेल्या अशोक अंबादास गायकवाड (रा.राजपिंप्री ता.गेवराई) या शेतकºयाचा बुधवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली.
गायकवाड गेवराईच्या इंडिया बँकेतून गत तीन वर्षापूर्वी शेतीसाठी दीड लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, यामुळे ते नैराश्यात होते. ३० जून रोजी गायकवाड बैलगाडी घेऊन गावातील शेतात गेले. तेथे त्यांनी कापसावर फवारायचे विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार पत्नी आणि मुलांना कळाल्यानंतर तातडीने उपचारासाठी त्यांना बीड येथील रूग्णालयात दाखल केले होते. ११ दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी नारायण अशोक गायकवाड यांच्या मािहतीवरुन रूग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.