गव्हाचे खळे करताना शेतकरी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:59 AM2021-03-13T04:59:37+5:302021-03-13T04:59:37+5:30

शिरूर कासार : गव्हाचे खळे करण्यासाठी आणलेल्या मळणी यंत्रात केस व साडी गुंतल्याने एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू ...

Death of a farmer woman while threshing wheat | गव्हाचे खळे करताना शेतकरी महिलेचा मृत्यू

गव्हाचे खळे करताना शेतकरी महिलेचा मृत्यू

Next

शिरूर कासार : गव्हाचे खळे करण्यासाठी आणलेल्या मळणी यंत्रात केस व साडी गुंतल्याने एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तालुक्यातील राक्षसभुवन येथे घडली. रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच जागेवरच उत्तरीय तपासणी केल्यानंतर मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उषाबाई तात्यासाहेब तांबे (३४) या सौंदड नावाच्या त्यांच्या शेतात भिवसेन तांबे यांचे मळणीयंत्र आणून गव्हाचे खळे करताना मळणी यंत्राच्या बेल्टमध्ये त्यांचे केस व साडी गुंडाळली गेली. तसेच त्यांच्या पोटाला मार लागून मोठी जखम होऊन आतडे बाहेर निघून तेही गुंडाळले गेल्याने जागीच मृत्यू झाला. यावेळी गोविंद दिनकर तांबे हे पत्नी, आई, वडिलांसह घरात होते. दरम्यान, मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी मळणी यंत्राकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांची चुलत भावजयी उषाबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. गोविंद तांबे यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र, उत्तरीय तपासणीला नेण्यासारखी स्थिती नसल्याने शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खाडे यांनी जागेवर पुढील प्रक्रिया केली. रात्रीच उशिरा मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त

होत आहे. मयत उषाबाई यांच्या पश्चात सासू, सासरा, पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस जमादार तथा बीट अंमलदार भागवत सानप हे करत आहेत. या घटनेबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून संबंधित शेतकरी कुटुंबास अर्थिक मदत मिळू शकते, तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे तालुका कृषी अधिकारी अमृत गांगुर्डे यांनी सांगितले.

===Photopath===

110321\11bed_12_11032021_14.jpg

===Caption===

उषाबाई तांबे

Web Title: Death of a farmer woman while threshing wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.