माजलगावकर महाराज यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:25+5:302021-09-11T04:34:25+5:30

गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगावकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दरम्यान, ...

Death of Majalgaonkar Maharaj | माजलगावकर महाराज यांचे देहावसान

माजलगावकर महाराज यांचे देहावसान

Next

गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगावकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगाव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, माजलगावकर महाराजांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता मठाच्या आवारातच समाधी विधी करण्यात येणार आहे. गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण-घडणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या माजलगावकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. २ डिसेंबर १९२७ साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. परुताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली माजलगाव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकांमध्ये महाराजांनी माजलगाव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगाव मठाचा विस्तार केला.

...

100921\purusttam karva_img-20210910-wa0020_14.jpg

माजलगांवकर महाराज यांचे देहावसान

Web Title: Death of Majalgaonkar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.