भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात वृध्दाचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:40 PM2022-11-14T12:40:47+5:302022-11-14T12:40:57+5:30

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील घटना

Death of an unknown elderly person in a collision with a speeding vehicle | भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात वृध्दाचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात वृध्दाचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा (बीड):
बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथे रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास चालत जाणाऱ्या वृध्दाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू दिला. मृत वृद्धाची ओळख पटली नसून मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने एका अनोळखी वृध्दाला जोराची धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृताची ओळख अद्याप पटली नाही. मृताचे वय 65 वर्षाच्या जवळपास आहे. मृताच्या अंगात पांढरा पायजामा, शर्टकाळे टिपके, गुलाबी पांढरा काळा पट्टा असलेले स्वेटर घातलेले आहे. पुढील तपास हवालदार बी.आर.तांदळे करीत आहेत.

Web Title: Death of an unknown elderly person in a collision with a speeding vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.