वारणीच्या दऱ्यात मोरासह अन्य पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:45+5:302021-07-17T04:26:45+5:30

शिरूर कासार : तालुक्यातील वारणी येथील उखळदऱ्यात गुरुवारी आणि शुक्रवार या दोन दिवसांत राष्ट्रीय पक्षी मोरासह अन्य पक्ष्यांचा ...

Death of other birds including peacocks in Varani valley | वारणीच्या दऱ्यात मोरासह अन्य पक्ष्यांचा मृत्यू

वारणीच्या दऱ्यात मोरासह अन्य पक्ष्यांचा मृत्यू

googlenewsNext

शिरूर कासार : तालुक्यातील वारणी येथील उखळदऱ्यात गुरुवारी आणि शुक्रवार या दोन दिवसांत राष्ट्रीय पक्षी मोरासह अन्य पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत मोरांना उत्तरीय तपासणीसाठी वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले असून, तपासणीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

उन्हाळ्यात लोणी शिवारात जवळपास बारा मोरांचा मृत्यू झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती वारणी येथे दोन दिवसांत घडली असून, गुरुवारी एक मोर तर शुक्रवारी एक मोर व एक लांडोरीसह तितर ३, पारवे ३, होले ३, लाव्हा १ इतके पक्षी मरण पावल्याने पक्षांच्या मृत्युबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

पक्ष्यांच्या मृत्यूबाबत वारणी येथील नागरिकांनी वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांना प्रथम माहिती सांगितली, नंतर सोनवणे यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक बद्रिनाथ परझणे, वनमजूर शिवाजी आघाव व सिद्धार्थ सोनवणे यांनी परिसरात पाहणी करून मृत्यूचे कारण समजून घेण्यासाठी मृत मोराला ताब्यात घेतले आहे.

घडलेल्या घटनेबाबत दुजोरा देत, त्या मृत मोराला उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासणी नंतर कारण स्पष्ट होईल. घातपाताचा प्रकार निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वनरक्षक बद्रीनाथ परझणे यांनी सांगितले.

मृत पक्ष्यांजवळ ज्वारीचे दाणे

त्या परिसराची पाहाणी केली असता, मृत पक्ष्यांजवळच काही ज्वारीचे दाणे दिसून आले. याबाबत थोडी साशंकता असून, शिकारीच्या उद्देशानेच ते वापरले असल्याचा संशय सिद्धार्थ सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी वनविभागाने वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात गस्त वाढविण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

160721\img-20210716-wa0059.jpg

फोटो

Web Title: Death of other birds including peacocks in Varani valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.