मृत्यूसत्र सुरूच; २० मृत्यूंसह १२३७ नवे रूग्ण, १०३४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:50+5:302021-04-26T04:30:50+5:30
जिल्ह्यात शनिवारी ४ हजार ७७ ९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यातील ३ हजार ...
जिल्ह्यात शनिवारी ४ हजार ७७ ९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यातील ३ हजार ५०३ जण निगेटिव्ह आले तर १ हजार २३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २२५, आष्टी १३०, बीड २३२, धारुर ७२, गेवराई ११७, केज १२९, माजलगाव ६२, परळी ७४, पाटोदा ६८, शिरुर ६९ व वडवणी तालुक्यातील ५९ जणांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात १०३४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
रविवारी जिल्ह्यात २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हे सर्व मृत्यू २२ ते २५ एप्रिल दरम्यान झाले. यात कुप्पा (ता.वडवणी) येथील ६० वर्षीय महिला, आडस (ता.केज) येथील ६२ वर्षीय महिला, कौठळी (ता.परळी) येथील ५५ वर्षीय पुरुष, नंदपूर (जि.बीड) येथील ६८ वर्षीय पुरुष, जिवाचीवाडी (ता.केज) येथील ६९ वर्षीय पुरुष, चादनवाडी (ता.अंबाजोगाई) येथील ७८ वर्षीय महिला, गजानानगर (ता.गेवराई) ६२ वर्षीय पुरुष, धोंडिपुरा बीड शहर येथील ७० वर्षीय महिला, प्रशांतनगर अंबाजोगाई येथील ७८ वर्षीय महिला, गेवराई शहरातील ८० वर्षीय महिला, देशपांडे गल्ली अंबाजोगाई येथील ७१ वर्षीय पुरुष, खडकीघाट येथील ८० वर्षीय महिला, आनंदनगर अंबाजोगाई येथील ६९ वर्षीय पुरुष, बालेपीर बीड येथील ४० वर्षीय पुरुष, आयशा कॉलनी परळी येथील ४५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ६६ वर्षीय महिला, क्रांतीनगर अंबाजोगाई येथील ६६ वर्षीय महिला, अंबाजोगाई शहरातील ७८ वर्षीय पुरुष, इस्थळ (ता.केज) येथील ६५ वर्षीय पुरुष व अंबाजोगाई तालुक्यातील २३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४७ हजार २ ९ २ इतकी झाली आहे. यापैकी ४० हजार ८५७ जणांनी कोरोनामुक्त झाले असून ८४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.