तिघांचा मृत्यू; २४८ नवे रुग्ण, ११३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:21+5:302021-03-16T04:33:21+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. रविवारनंतर सोमवारीही बाधितांच्या आकड्याने दाेनशेचा आकडा पार गेला. २ हजार ४८३ जणांची ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. रविवारनंतर सोमवारीही बाधितांच्या आकड्याने दाेनशेचा आकडा पार गेला. २ हजार ४८३ जणांची चाचणी केली गेली. यात २ हजार २३५ जण निगेटिव्ह आढळून आले, तर २४८ जण बाधित सापडले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५०, आष्टीत ९, बीडमध्ये ११५, धारुरमध्ये ४, गेवराईत १५, केजमध्ये ११, माजलगावात २७, परळीत ६, पाटोद्यात ५, शिरूरमध्ये ३ आणि वडवणी तालुक्यात ३ नवे रुग्ण आढळून आले, तर बीड शहरातील शहेंशाह नगर भागातील ६७ वर्षीय पुरुष, गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील ६० वर्षीय महिला व कोल्हेर येथीलच ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २० हजार ६७५ इतका झाला असून, १९ हजार १३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ५९३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.