तरुणाचा मृत्यू; नेकनूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:56 AM2017-12-23T00:56:32+5:302017-12-23T00:56:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शेतीच्या वादावरून एका तरुणास दोघांनी मारहाण केली होती. यात तरूण गंभीर जखमी झाला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतीच्या वादावरून एका तरुणास दोघांनी मारहाण केली होती. यात तरूण गंभीर जखमी झाला होता. दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यावर त्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
अजीनाथ चंद्रभान काळकुटे (रा.ससेवाडी) असे मयत तरूणाचे नाव आहे. अजिनाथ व रंगनाथ काळकुटे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून शेतीचा वाद होता. या वादातून ९ नोव्हेंबर रोजी रंगनाथ सोपान काळकुटे व पप्पू बन्सी कदम या दोघांनी आजीनाथला मारहाण करून गंभीररित्या जखमी केले होते. या जखमीस उपचारार्थ औरंगाबादला दाखल केले.
त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. तेंव्हापासून आजीनाथ काळकुटे हे कोमात होते. याप्रकरणी आरोपी रंगनाथ काळकुटे व पप्पू कदम या दोघाविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात पूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु शुक्रवारी उपचारादरम्यान आजीनाथचा मृत्यू झाला. त्यानंतर कलम वाढवून खुनाचा गुन्हा नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.