अंबाजोगाई बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचेेे निर्णय घेऊ - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:36+5:302021-08-13T04:38:36+5:30
अंबाजोगाई : बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्य प्रशासक गोविंदराव ...
अंबाजोगाई : बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख यांनी दिली. बाजार समितीच्या मोकळ्या जागेतील मजबुतीकरण व खडीकरण कामाचे मंगळवारी भूमिपूजन झाले. याप्रसंगी देशमुख बोलत होते.
अंबाजोगाई बाजार समिती परिसरात अनेक वर्षांपासून विकासाची कामे खोळंबली होती. बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा पुरविणे, समितीत सुसज्ज रस्ते, नाल्यांची कामे यापुढे प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न प्रशासक मंडळ करणार असल्याचे मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख यांनी सांगितले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक मंडळ काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून चाळीस लाख रुपये खर्चातून मार्केट यार्ड भागात सिमेंट रस्ते, नाल्या, मजबुतीकरण व खडीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रशासक प्रकाश सोळंकी, आबासाहेब पांडे, अमर देशमुख, भूषण ठोंबरे, सत्यजित सिरसाट, विलास बापू मोरेे, अर्जुन वाघमारे, अल्ताफ पटेल, दत्तात्रय यादव, माणिकराव कातकडे, राजू भन्साळी, सचिव एम. एस. जाधव, बी. एम. लोमटे, पी. एस. काळे, रोखपाल डी. ए. नांदुरकर यांच्यासह बाजार समितीतील कर्मचारी उपस्थित होते.
100821\131530551419-img-20210810-wa0059.jpg
अंबाजोगाई बाजार समितीत विविध विकासकामे करण्यात आली