व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा : विनायक मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:02 AM2018-01-02T01:02:59+5:302018-01-02T01:03:04+5:30

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. तरूणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनाधिनतेच्या विरोधात प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन होऊन ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत व्यसनाधिनतेच्या विरोधात समाजप्रबोधनासाठी पुढील साहित्य संमेलनाचे बीड येथे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

Decide to stay away from addiction: Vinayak Mete | व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा : विनायक मेटे

व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा : विनायक मेटे

googlenewsNext
ठळक मुद्देबीडमध्ये व्यसनासंदर्भात प्रबोधन साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. तरूणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनाधिनतेच्या विरोधात प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन होऊन ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत व्यसनाधिनतेच्या विरोधात समाजप्रबोधनासाठी पुढील साहित्य संमेलनाचे बीड येथे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, मराठवाडा विकास मंच, मुंबई व कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीडमधील जिल्हा क्रीडा संकुलात व्यसनमुक्त अभियानानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बडोले बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, आ. विनायक मेटे, माजी आ. बदामराव पंडित, संदीप क्षीरसागर, पत्रकार विजयराज बंब, राजेंद्र म्हस्के, अशोक हिंगे, अशोक लोढा, कल्याण आखाडे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, देशाच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा असलेली तरूणाई आज व्यसनाच्या आहारी जात आहे. ही देशासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. या तरुणाईला व्यवसापासून दूर ठेवण्यासाठी राज्यात विविध संस्थांच्या माध्यमातून व्यसनाधिनतेच्या विरोधात विविध प्रबोधनात्मक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानात उत्कृष्ट काम करणाºया संस्थांना शासनामार्फत पुरस्कृत करण्यात येत आहे.

मद्यपान, तंबाखू, गुटखा यासारख्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुणाईच्या आरोग्यावर भयंकर असे परिणाम होण्याबरोबरच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विकृती वाढत आहे. कुटुंबाची राखरांगोळी करणाºया, तसेच अनारोग्य निर्माण करणाºया या व्यसनाधिनतेच्या विरोधात आ. मेटे यांनी उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनाविरोधात प्रबोधनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री जानकर म्हणाले की, व्यसनाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होणाºया तरुण पिढीला व्यसनापासून दूर करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. समाजातील प्रत्येक नागरिकाने स्वत: व्यसनापासुन दूर राहून कोणी व्यसन करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, शहरातील नागरिक, महिला, तरुण, तरुणींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

तरूण पिढीला व्यसनापासून रोखणे आवश्यक
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आ. विनायक मेटे म्हणाले की, राज्यात व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत आहेत. यात तरु णपिढी मोठया संख्येने ओढली जात असून, तरूणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्याच विचारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा. त्याचप्रमाणे या कामात सर्व पदाधिकाºयांनी एकत्रीत येऊन काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विजयराज बंब यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Decide to stay away from addiction: Vinayak Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.