करुणा शर्मांच्या जामिनावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:11+5:302021-09-21T04:37:11+5:30
अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम २० सप्टेंबरला ...
अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम २० सप्टेंबरला एक दिवसाने वाढला आहे. त्यांच्या जामिनावर २१ सप्टेंबरला निर्णय होणार आहे.
करुणा शर्मा ५ सप्टेंबरला परळी येथे आल्या होत्या. यावेळी वैद्यनाथ मंदिर परिसरात महिलांना
जातीवाचक शिवीगाळ करून बेबी तांबोळी या महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. १८ सप्टेंबरला न्या.सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्यावतीने ॲड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले होते. २० सप्टेंबरला निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालय २१ सप्टेंबरला जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम एक दिवसाने वाढला आहे.