दुष्काळी उपाययोजनेसाठी गाजर दाखवत घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:25 AM2019-01-11T00:25:41+5:302019-01-11T00:26:55+5:30
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई व चाराटंचाई यावर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने गाजर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई व चाराटंचाई यावर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने गाजर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांना जनावारांच्या चाºयासह पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून मदतीच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कुठलीही मदत मिळालेली नाही. शासनाच्या मदतीच्या घोषणा म्हणजे गाजर असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी व्यक्त केली. सुशिक्षित बेरोजरागर तरुणांनाना नोकरी देण्याचे अश्वासन शासनाने दिले होते. मात्र ते देखील पूर्ण केले नाही. शासनाने अश्वासनाचे गाजर न देता ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी किशोर गिराम पाटील, जगदीश गिराम, अविनाश घिगे, अविनाश पवार, संदीप कदम, राहुल गिराम, सय्यद, सतीश ठोसर, सुमित गिराम, बालाजी गिराम, अशोक हरनमारे, प्रकाश सातपुते, सचिन गांडेळे, दत्ता प्रभाळे, भगवान मस्के, मुकेश शिवगण यांच्यासह आदी आंदोलनात सहभागी झाले होते.