सोमनाथवाडी येथील पुलाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:38+5:302021-08-25T04:38:38+5:30
बीड : लिंबागणेश परिसरातील बांधवांनी विश्वास व्यक्त करून माझ्या पत्नीला जिल्हा परिषद सभागृहात जाण्याची संधी दिली. उपाध्यक्षपद सांभाळण्याचे भाग्य ...
बीड : लिंबागणेश परिसरातील बांधवांनी विश्वास व्यक्त करून माझ्या पत्नीला जिल्हा परिषद सभागृहात जाण्याची संधी दिली. उपाध्यक्षपद सांभाळण्याचे भाग्य लाभले. काम करण्याची ऊर्जा मिळाली. या भागातील जनहिताची कामे करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. बीड, वरवटी, भाळवणी, लिंबागणेश हा डांबरी रस्ता पूर्ण करता आला. या रस्त्यामुळे डोंगरपट्ट्यातील ग्रामस्थांसाठी वाहतुकीसाठी उत्तम रस्ता जनतेच्या सेवेत आहे. सोमनाथवाडी येथील पूल पूर्ण केला, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील सोनमाथवाडी येथील पूल लोकार्पणप्रसंगी केले.
लिंबगणेश जिप गटातील सोमनाथवाडी येथील जिल्हा परिषद वार्षिक नियोजनेंतर्गत १५ लक्ष रुपये बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि बेलेश्वर संस्थांनचे मठाधिपती हभप महादेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी हभप तुकाराम महाराज भारती, लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, बाळासाहेब मोरे, सरपंच बाळासाहेब वायभट, चेअरमन बाळासाहेब वायभट, पोखरी सरपंच बाबासाहेब खिल्लारे, मुळकवाडी सरपंच कृष्णा पितळे, सरपंच वसंत गुंदेकर, मुकादम कारभारी मुक्कादम, चेअरमन प्रदीप भाऊ गुंदेकर, अभिजित गायकवाड, सुभाष पितळे, शरद बडगे, गणेश तोडेकर, अवधूत ढास, पंकज धांडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची सवाद्य गावातून मिरवणूक काढली.
यावेळी डॉ. ढवळे म्हणाले की, राजेंद्र मस्के यांनी नेहमी या परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. राजकारणात कायमस्वरूपी राहायचे असेल, तर सतत जनतेत राहावे लागते. राजेंद्र मस्के यांची नाळ जनतेशी जोडली आहे. या भागातील रस्त्यांना प्राधान्य देऊन विकासाची अनेक कामे केली. पिंपळवाडी बिंदुसरा नदीवरील पुलाला साडेपाच कोटी रुपये निधी प्राप्त करून डोंगरपट्ट्यातील जनतेची महत्त्वाची समस्या सोडवली. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन या परिसरातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे म्हणाले की, जनहिताच्या प्रत्येक आंदोलनात राजेंद्र मस्केंचा पुढाकार असतो. पीक नुकसान, दूध भाववाढ, दुष्काळ यासारख्या प्रत्येक प्रश्नासाठी कायम त्यांनी आवाज उठविला आहे.
240821\24_2_bed_8_24082021_14.jpeg
सोमनाथवाडी येथील पूलाचे लोकार्पण