आपेगाव येथे कोविड केअर सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:00+5:302021-05-21T04:35:00+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभाग बीड, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि ...
जिल्हा परिषद आरोग्य विभाग बीड, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जय किसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि. प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या पुढाकार व संकल्पनेतून सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर येथे मोफत उपचार सुरू झाले आहेत.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना आ. संजय दौंड म्हणाले, आपेगाव येथील सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर म्हणजे माणुसकीचे उत्तम उदाहरण असून सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा. याप्रसंगी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले,अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची दररोज वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रूग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची उपचारासाठी होणारी परवड थांबावी या उद्देशाने हे कोविड सेंटर सुरू केले आहे. यावेळी सुविधांची पाहणी करून डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून,रूग्णांना भोजन,नाश्ता आदी व्यवस्थेचे नियोजन पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. कर्मवीर शेषेराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आ. पृथ्वीराज साठे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सिरसाट, जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख,डॉ.नरेंद्र काळे, विलास सोनवणे,अनिकेत लोहिया,गोविंद देशमुख,राहुल सोनवणे,हनुमंत मोरे,ॲड.माधव जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार,ह.भ.प.लालासाहेब पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे,
आबासाहेब पांडे,सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे,जयजीत शिंदे संतोष सोनवणे,आश्रुबा करडे,केशव ढगे,शंभूराजे देशमुख,ईश्वर शिंदे,अशोक देशमुख,शरद शिंदे,गणेश गंगणे उपस्थित होते.