धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:09+5:302021-07-18T04:24:09+5:30

परळी : परळीचे एक दानशूर व्यक्तिमत्त्व तत्कालीन काँग्रेसचे नेते व परळीचे माजी नगराध्यक्ष माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनंजय ...

Dedication of Mokshavahini Swargaratha of Dharmadhikari Charitable Trust | धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण

धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण

Next

परळी : परळीचे एक दानशूर व्यक्तिमत्त्व तत्कालीन काँग्रेसचे नेते व परळीचे माजी नगराध्यक्ष माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आरोग्य सेवासप्ताहा’च्या निमित्ताने स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘मोक्षवाहिनी स्वर्गरथा’चे लोकार्पण माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला व माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, श्रीकांत मांडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ट्रस्टचे सामाजिक दायित्व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विजयप्रकाश तोतला यांनी केले. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हा ट्रस्ट अग्रेसर आहे. स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारींच्या जनसेवेचाच हा वारसा असल्याचे श्रीकांत मांडे यांनी सांगितले. परळीचे वाढते शहरीकरण बघता अजून एका ‘स्वर्गरथा’ची आवश्यकता भासत होती. तेव्हा ही गरज ओळखून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे वाहन नगर परिषद, परळी वैजनाथ यांना देण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे यांना प्रतीकात्मक चावी भेट देऊन वाहन सुपुर्द करण्यात आले. स्वर्गरथ सेवा ही पूर्णपणे मोफत असणार आहे. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला, जाबेर खान पठाण, सुरेश टाक, अय्युब पठाण, डॉ. संतोष मुंडे, अझीज कच्छी, वैजनाथ बागवाले, वैजनाथ सोळले, अनंत इंगळे, अनिल आष्टेकर, नितीन कुलकर्णी, गोविंद कुकर, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, श्रीकांत मांडे, शंकर कापसे, डॉ. आनंद टिंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dedication of Mokshavahini Swargaratha of Dharmadhikari Charitable Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.