रुग्णांच्या नातेवाईकांसाठींच्या जलकुंभाचा लोकार्पण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:59+5:302021-06-30T04:21:59+5:30

या कार्यक्रमाचे उदघाटन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार होते. यावेळी डॉ.राकेश जाधव, ...

Dedication program of Jalkumbh for the relatives of the patients | रुग्णांच्या नातेवाईकांसाठींच्या जलकुंभाचा लोकार्पण कार्यक्रम

रुग्णांच्या नातेवाईकांसाठींच्या जलकुंभाचा लोकार्पण कार्यक्रम

googlenewsNext

या कार्यक्रमाचे उदघाटन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार होते.

यावेळी डॉ.राकेश जाधव, डॉ.नागेश अब्दागिरे, रोटरीचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण देशपांडे, सूर्यकांत महाजन, संतोष पवार, दीपक कर्णावट, तानाजी देशमुख, सारंग पुजारी, ‘रोटरी’चे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, प्रकल्प समन्वयक धनराज सोळंकी, प्रदीप झरकर,मोईन शेख, गणेश राऊत यांची उपस्थिती होती.

रोटरी क्लबच्या वतीने बसविण्यात आलेल्या या जलकुंभातून दररोज एक हजार लिटर तर ताशी दोनशे लिटर याप्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर झाली आहे.

यावेळी डॉ.शंकर धपाटे, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.राकेश जाधव, सूर्यकांत महाजन, प्रवीण देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत वृक्षभेट देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. संचलन संतोष मोहिते पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदीप झरकर यांनी मानले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य दामोदर थोरात, अरुण असरडोहकर, सुहास काटे, जगदीश जाजू, पद्माकर सेलमुकर, गोरख मुंडे, आनंद कर्णावट, स्वप्नील परदेशी, ललित बजाज, नरसिंग दरगड, मोईन शेख, सचिन बेंबडे, डॉ.अनिल केंद्रे, राधेश्याम लोहिया, गोपाळ पारीख यांच्यासह ‘रोटरी’चे सदस्य उपस्थित होते.

===Photopath===

290621\img-20210628-wa0112_14.jpg

Web Title: Dedication program of Jalkumbh for the relatives of the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.